
सातारा : बालरोग विभागासाठी १३. ५० कोटी मंजूर
बातमी थोडक्यात
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागासाठी यंत्रसामग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी १३. ५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाबाबत पाठपुरावा करीत आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने बालरोग विभागासाठी (एनआयसीयू) निधी मंजूर केला आहे.