
धोरेगाव जवळ कंटेनर ट्रकची टक्कर; चालक गंभीर, ३ तास वाहतूक ठप्प
बातमी थोडक्यात
शिवणा नदीच्या पुलावर धोरेगाव जवळ कंटेनर ट्रकची टक्कर होऊन चालक गंभीर जखमी झाला. नागरिकांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचविले तर महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली. पुलावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचे सांगून स्थानिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.