
वैभवचा लोहगावला विजेचा धक्का लागून मृत्यू
बातमी थोडक्यात
आपल्या कुटुंबासोबत बांधत असलेल्या घरामध्ये विजेच्या होल्डरमधून तार काढताना ११ वर्षांचा वैभव मधुकर भालेराव नावाचा मुलगा विजेचा धक्का लागून मरण पावला. या घटनेमुळे लोहगावच्या कारखान परिसरात सर्वत्र शोक व्यक्त होत होता. पिशोर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.