
राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणासह आज नाशिक कुंभमेळ्याला प्रारंभ
बातमी थोडक्यात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर ध्वजारोहण सोहळ्यासह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आज सिंहस्थ महाकुंभमेळ्याला प्रारंभ झाला. दर १२ वर्षांनी होणारा हा महाकुंभमेळा २२ महिने चालणार असून नाशिकमध्ये ८ ते १० कोटी तर त्र्यंबकेश्वरमध्ये ४ कोटी भाविक या महाकुंभमेळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या महाकुंभमेळ्याच्या पूर्वसंध्येला शंख फुंकण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही करण्यात आला.