
पंढरपूर येथे वीजधक्क्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू
बातमी थोडक्यात
जुन्या कराड नाक्यावरील दुसऱ्या मजल्यावरील सेंटिंगच्या कामादरम्यान विद्युत तारांना स्पर्श केल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. शुक्रवारी ३० तारखेला सकाळी ही घटना घडली. विजेचा धक्का लागून कामगार खाली पडून जागीच ठार झाला. ठेकेदार, घरमालक आणि वीज वितरण कंपनी यांच्यावर कारवाई होईपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह नेण्यास नकार दिला.