
दुष्काळात चारा निर्यातीवर बंदी
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे इतर राज्यांत चारा पाठविण्यावर बंदी घालण्यात आली असून महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने निर्णय घेतला आहे. सरकारी व कॉर्पोरेट जमिनीवर चारा पिके घेतली जाणार असून पडीक जमिनीचा वापर उत्पादनासाठी केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारा उत्पादनाला चालना देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे.