
दिवाळीत पुणे पाणी कपात शिथिल
बातमी थोडक्यात
नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी दिवाळीत गुरुवारी पाणी कपात शिथिल करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. दिवाळीच्या तयारीमध्ये घरातील स्वच्छता, शाळांना सुट्टी यांसारख्या कारणांमुळे पाण्याची मागणी वाढते. शिथिल केलेल्या पाणी कपातीमुळे पुणेकरांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार आहे.