
विरोधी पक्षनेत्याची पाणीसंकट उपाययोजनांची मागणी
बातमी थोडक्यात
वाढत्या शहरीकरणामुळे व ३० लाखांहून अधिक लोकसंख्येमुळे शहरात पाणीटंचाई होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. भोईर यांनी पिण्याच्या पाण्याने वाहने धुण्यास बंदी घालण्याची व उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड करण्याची तरतूद केली असून नवीन बांधकामात पाणी वापरास तात्पुरती बंदी घालण्याची मागणी केली आहे. पाणी व्यवस्थापनासाठी विशेष समिती स्थापन करून दर पंधरा दिवसांनी आढावा घेतला जाणार आहे.