
श्रीक्षेत्र लेण्याद्री : गणपती पूजेसाठी भाविकांची गर्दी
बातमी थोडक्यात
श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविक भाविकांची गर्दी झाली असून सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. पुणे, अहिल्या नगर, मुंबई, ठाणे, नाशिक, जुन्नर येथून भाविक व पर्यटक यांनी दर्शनासाठी भेट दिली असून परिसरात फुलांची सजावट करण्यात आली असून सकाळी ६.१५ वाजता सदाशिव तम्हाणे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजन करण्यात आले. भाविकांच्या गर्दीमुळे लेण्याद्री परिसरात यात्रेकरूंचे वातावरण निर्माण झाले होते.