
दत्तात्रय भरणे: दुष्काळग्रस्त तालुक्यात ९७ टक्के पीक नुकसान अहवाल पूर्ण
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यात ९७ टक्के पीक नुकसान अहवाल पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या भागातील शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारकडून ५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. उर्वरित नुकसान दोन ते चार दिवसात पूर्ण होणार असून, त्यामुळे नुकसानीची स्पष्ट माहिती मिळणार आहे.