
शिरनांदगी बाण येथे सापडलेला पहिला फरमान
बातमी थोडक्यात
सिद्धनाथ मंदिराच्या शेजारील ओढ्यापाशी फरमानचा शिलालेख सापडला असून जिल्ह्यातील पहिला फरमान इनामासह आढळला आहे. या शिलालेखात स्थानिक गणदार, मुकादम, महालदार आदी महसूल अधिकाऱ्यांनी जमीन, उत्पन्न व हक्क दिल्याचा तपशील आहे. या फरमानात इनामाची व महसूल व्यवस्थेची अधिकृत माहिती आहे.