
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा व २११ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागल्या आहेत. या निर्णयामुळे विदर्भातील राजकीय पक्ष व उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत विदर्भातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.