
काशिदमध्ये धरण फुटल्याने रो-रो जेट्टी उद्ध्वस्त
बातमी थोडक्यात
करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या ब्रेकवॉटरच्या धरणामध्ये भगदाड पडल्याने काशिद येथील रो-रो जेट्टी लाटांच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली आहे. या धरण फुटल्याने काशिद ते मुंबई दरम्यान ये-जा करणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक नागरिकांवर परिणाम होत असून रो-रो प्रकल्प अपयशी ठरण्याची शक्यता आहे. काशिद-मुंबई रो-रो सेवा पुन्हा एकदा उशिरा सुरू होणार आहे.