
लालवण गांजा लागवड उधळली
बातमी थोडक्यात
पिषोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालवण येथे अवैध गांजा लागवड आढळून आली. पाडाळी एकफाटा शिवारातील शेत क्रमांक २८ वर धाड टाकून १४१ गांजाची रोपे आणि ५२ लाख ९७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. चैनसिंग बिमरोटे याला अटक करून त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.