
महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी एनएचएआय करणार एआय तंत्रज्ञानाचा वापर
बातमी थोडक्यात
अतिवेगाच्या दंडाबाबत वाहनचालकांच्या तक्रारींवर उपाय म्हणून महामार्गांवर वेगाची मर्यादा लागू करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे वाहतूक शिस्त सुधारेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. पहिल्या टप्प्यात एनएचएआयच्या १० हजार कि.मी. महामार्गांवर स्वयंचलित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येणार आहे.