
पालशीत लातूर पोलिसांच्या पथकावर जमावाचा हल्ला, ६ जखमी
बातमी थोडक्यात
पालशीत लातूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकावर जमावाने हल्ला केला. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी पथक आले होते. हट्टा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, हिंगोली पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत आहेत.