
कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये भीषण आग
बातमी थोडक्यात
चाफेकर चौकाजवळील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत १२ दुचाकी, २ चारचाकी व १ सायकलसह १५ वाहनांचे नुकसान झाले असून एक जण जखमी झाला आहे. अग्निशमन दल व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.