
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि मंदिरांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मंदिर महासंघाची
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि मंदिरांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली. पावसाच्या दीर्घकाळ खंडामुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे ९९० गावातील ३,११,२३४ शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार वाढत आहे.