
दिवाळीच्या वधाऱ्यासाठी सज्ज झाले इलेक्ट्रॉनिक्स मार्केट
बातमी थोडक्यात
यशस्वी दसऱ्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केट दिवाळीच्या जोरदार हंगामासाठी सज्ज झाले असून विक्रेते विक्रीबाबत आशावादी आहेत. मोबाईल फोन, एसी, रेफ्रिजरेटर, एलईडी टीव्हीवर सवलती आणि खरेदी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. वाढत्या किमती आणि महागाई असूनही, सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढेल, अशी अपेक्षा दुकानदारांना आहे.