
ऊस दरासाठी ओगलेवाडीत शेतकऱ्यांनी रस्ता रोखला
बातमी थोडक्यात
ऊस दर क्विंटल ५५०० रुपये, साखर व इथेनॉलचे दर निश्चित करावे, यासाठी ओगलेवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला. मजुरी, खते यासह उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आंदोलनाला उतरले. योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली. ऊस दरासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू लागल्या आहेत.