
दुष्काळामुळे साताऱ्यातील निवडणुका पुढे ढकलल्या
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने राज्य सरकारने साताऱ्यातील १०९ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मदत व पुनर्वसन विभागाच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा परिणाम अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, पिंपळे बुद्रुक यासह इतर संस्थांवर होणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित राहील.