
सोलापूर बायपासवर ट्रकची टक्कर
बातमी थोडक्यात
सोलापूर-हैदराबाद बायपास रस्त्यावर कंटेनर ट्रक आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. यात दोन्ही चालकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून वाहतूक सुरळीत केली.