
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक : माने, जगताप यांच्यासह नऊ जणांचे अर्ज दाखल
बातमी थोडक्यात
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप माने, जयवंतराव जगताप यांच्यासह नऊ जणांनी बुधवारी अर्ज दाखल केले. गेल्या तीन दिवसांत 408 हून अधिक लोकांनी अर्ज खरेदी केले असून पुढील दोन दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत केवळ 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.