
वास्कोच्या आगीत बाजारपेठांची राखरांगोळी
बातमी थोडक्यात
वास्कोमध्ये बुधवारी रात्री दोन आगी लागल्या. यात वाहन सुटे भाग विक्रीचे दुकान जळून खाक झाले. तसेच मॉडर्न मार्केटमधील कपडे आणि तळमजल्यावरील दुकानांचे मोठे नुकसान झाले. अज्ञात कारणाने लागलेल्या या आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच यामुळे सर्वत्र समाजात चिंता पसरली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत होते. आमदार कृष्णा साळकर व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.