वाळिवंडेत चिरेखणी वादावरून मारहाण
बातमी थोडक्यात
वाळिवंडेत सीताराम जाधव यांच्या चिरेखणीवरून झालेल्या वादातून दोघांना मारहाण करण्यात आली. चांदोशी येथील चार संशयितांनी सचिन लोके आणि तिमीर माणगावकर यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी आणि लाथांनी हल्ला केला. संशयितांनी लोके यांच्या हातातून ब्रेसलेट आणि सोन्याची चेन हिसकावून घेतली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.