
साक्रीच्या पशुवैद्यकीय इमारतीत महिलेचा मृतदेह
बातमी थोडक्यात
साक्री शहरात पशुवैद्यकीय विभागाच्या जुन्या इमारतीत महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. महिलेची हत्या कुणीतरी धारदार वस्तूने केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेला ग्रॅनाइटचा दगड सापडला. रमेश नावाचा कचरा गोळा करणारा माणूस या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आहे.