
माळशेज घाटातील 1500 मेगावॅट वीज प्रकल्पाने 79 गावांना धोका
बातमी थोडक्यात
माळशेज घाटातील 1500 मेगावॅट वीज प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने ठाणे जिल्ह्यातील 55 गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भोरंडे गाव हे धरण बांधकामामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरपंच अप्पा कोकणे यांनी या प्रकल्पाबाबत गावकऱ्यांना माहिती दिली नसल्याने तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.