
वैजापूरच्या शेतकऱ्यांची नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्याबाबत मागणी
बातमी थोडक्यात
नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्याचा मागणीसाठी वैजापूरच्या शेतकऱ्यांनी आधार शेतकरी जलदूत समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा नांदूर मधमेश्वर कार्यालयावर उपोषणाने संपला. आंदोलनादरम्यान शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.