
मानपाडा-कटाई नाका ते तळोजा मेट्रो ३.५ वर्षात पूर्ण होणार
बातमी थोडक्यात
राज्य सरकारने मानपाडा-कटाई नाका ते तळोजा मेट्रो कॉरिडॉर १२-ए, १८. ४० कि. मी. लांबीचा, १२ स्थानकांचा १३ हजार ८५६ कोटींचा प्रकल्प मंजूर केला. कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई दरम्यानची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क सुधारण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अधिकाऱ्यांनी काम जलद गतीने पूर्ण करावे. साडेतीन वर्षात प्रकल्प पूर्ण करावा.