
पुणे: ४५० दृष्टिहीनांसाठी दिवाळी भोजन
बातमी थोडक्यात
पुणे अंध पुरुष संघ आणि रोटरी क्लब पुणे शनिवार वाडा यांच्या वतीने शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमात ४५० दृष्टिहीण व्यक्तींना दिवाळी भोजन वाटण्यात आले. या कार्यक्रमातून दृष्टिहीण व्यक्ती आणि त्यांच्या परिवाराने आनंदात दिवाळी साजरी केली. दृष्टिहीण व्यक्तींना दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.