
पुर्णात गुरांच्या हल्ल्यात म्हैस ठार
बातमी थोडक्यात
पुर्णा तालुक्यातील पंगरा-बाराबडी महामार्गालगत शेतकरी आनंद नागोराव धोन यांच्या शेतात बांधलेल्या गुरांवर अज्ञात व्यक्तीने लोखंडी शस्त्राने हल्ला केल्याने २७ ऑक्टोबर रोजी जखमी झालेल्या म्हशीचा मृत्यू झाला. २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात दोन म्हशी ठार झाल्या, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. काही म्हशींच्या योनीमध्ये लोखंडी रॉड टाकून त्यांना जखमी करण्यात आले. जखमी म्हशींवर चुडावा येथील शासकीय पशुधन विकास अधिकारी डॉ. कसबे यांनी उपचार केले. आधीच दुष्काळाचा सामना करत असलेल्या धोन कुटुंबाला गुरांच्या मृत्यूमुळे मोठे आर्थिक संकट आले आहे. या प्रकरणातील आरोपींना शोधून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच महसूल विभाग व शासनाने तातडीने पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.