
पुरंदर विमानतळ सल्लागार निविदा सुरू
बातमी थोडक्यात
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून एमएडीसीने सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सल्लागार तपशीलवार प्रकल्प अहवालासाठी तांत्रिक सर्वेक्षण, अभियांत्रिकी अभ्यास आणि आर्थिक व्यवहार्यता अभ्यास करेल. पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये १,२१६ हेक्टर जमिनीवर विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे.