
दुष्काळामुळे सूक्ष्म वित्त कर्ज स्थगित करण्याची खासदारांची मागणी
बातमी थोडक्यात
शेतकरी व नागरिकांमधील गंभीर दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा हवाला देत सूक्ष्म कर्ज वसुली थांबवण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेंनिबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या ७० टक्के तक्रारी वसुलीच्या संदर्भात असतात, असे सांगून त्यांनी व्याजदर नियंत्रणात आणण्यासाठी खासगी विधेयक आणण्याची घोषणा केली. सूक्ष्म कर्ज कंपनीच्या प्रतिनिधींवर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार कारवाई करण्याची मागणी केली.