
महाराष्ट्राला अर्णब चक्रीवादळाचा धोका
बातमी थोडक्यात
बंगालच्या उपसागरात 'अर्णब' चक्रीवादळ तयार झाले असून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातही पावसाची शक्यता आहे. विदर्भसह अन्य भागातही वादळाचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी ताज्या अंदाजावर लक्ष ठेवावे.