
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिसेंबर मध्ये ०.५% ने वाढवणार
बातमी थोडक्यात
स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिसेंबर मध्ये व्याज दर अर्धा टक्का वाढवणार असा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी कर्जाच्या मागणीवर होणारा परिणाम त्वरित नसेल पण कालांतराने तो स्पष्ट होईल असे मत व्यक्त केले आहे. व्याज दर वाढल्यास वाहन, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांसारख्या क्षेत्रांतील कर्जाची मागणी घटण्याची शक्यता आहे.