
औरला येथील कार्यक्रमाचा समारोप करताना महाराजांनी सांगितले पालक संस्काराचे आवाहन
बातमी थोडक्यात
औरला येथील अखंड हरिनाम सप्ताह व संत ज्ञानेश्वरी पारायण समारोप कार्यक्रमात ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी पालकांनी मुलांमध्ये संस्काराचे आवाहन केले. वाईट संगतीचा वाईट परिणाम तरुणांवर होतो. पालकांनी सतर्क राहावे. कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटण्यात आला.