
वीज बंदिमुळे आज सांगलीत पाणी कपात
बातमी थोडक्यात
सांगली महापालिका क्षेत्रात आज वीज बंदिमुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वीज कंपनी आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याने पाण्याची टाकी कमी भरल्याने २५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. महापालिकेने शासकीय आदेशानुसार १० टक्के पाणी कपात केली आहे, परंतु नागरिकांना मात्र तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टँक रिकामे असल्याने बुधवारीही अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.