
शुकलेश्वर मंदिराजवळील कुलूप लावलेल्या घरातून चोरट्यांनी दागिने चोरले
बातमी थोडक्यात
नगरदेवळे येथील शुकलेश्वर मंदिराजवळील कुलूप लावलेल्या घरात चोरट्यांनी घुसून १ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २.१५ या कालावधीत चोरी झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.