
इलेक्ट्रिक शॉक डेथ: मध्य प्रदेशात लाईव्ह वायरजवळ गुटखा थुंकल्याने वृद्धाचा मृत्यू
बातमी थोडक्यात
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गंजबसोदा येथे ६० वर्षीय प्रभू लाल गुप्ता नावाच्या व्यक्तीचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. गुप्ता गॅलरीतून गुटखा थुंकत असताना ११ केव्हीच्या विद्युत ताराच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. निर्माणाधीन इमारतीवरून जाणारी हायटेंशनची वीज नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे.