
भांडुप स्टेशनवर एसी लोकलने चिरडून तरुणाचा मृत्यू
बातमी थोडक्यात
भांडुप रेल्वे स्टेशनवर एसी लोकलने धडक दिल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. साहील थिटे हा प्लॅटफॉर्म ३ वरून रेल्वे रूळ ओलांडत असताना हा अपघात झाला. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आता त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.