
इथेनॉल वापरास चालना देण्यासाठी शासनाकडून नियमांत सुधारणा
बातमी थोडक्यात
केंद्र सरकारने इथेनॉलचे प्रमाण अधिक वापरून फ्लेक्स इंधन वाहनांना चालना देण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा केली आहे. फ्लेक्स इंधन वाहनांचे उत्पादन आणि विक्रीसाठीचे नियम अधिक स्पष्ट झाल्याने वाहन कंपन्यांना फायदा होईल. नियमांत बदल झाल्यानंतर फ्लेक्स इंधन वाहनांच्या वापरास चालना मिळण्याची शक्यता आहे.