
शंकराशेठ रोडवर शिवाई बसला आग; २० प्रवासी सुखरूप
बातमी थोडक्यात
शंकराशेठ रोडवर शॉर्ट सर्किटमुळे शिवाई इलेक्ट्रिक बसला आग लागली. चालक आणि वाहकाने २० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाने दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले, वाहतूक विस्कळीत होणे टळले.