
दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे आवाहन शिंदे यांनी केले.
बातमी थोडक्यात
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांना केले. शिवसेना पक्षानं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलमध्ये दुष्काळग्रस्त नागरिकांना १० हजार दिवाळी रेशन किटचे वाटप केले. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या बँका आणि खाजगी वित्त कंपन्यांविरोधात शिंदे यांनी इशारा दिला आणि कठोर कारवाईची धमकी दिली.