
पुण्यातील चालत्या शिवाई ई-बसला आग
बातमी थोडक्यात
पुण्यातील स्वारगेट येथील सेव्हन लव्हज चौकात चालत्या शिवाई ई-बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाला धूर व आग लागल्याचे दिसल्याने त्याने बस बाजूला घेऊन बसमधील सर्व १७ प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजले आहे.