
मनसे नेत्याची भीमाशंकरमधील टोरेंटच्या झाडातोडीवर टीका
बातमी थोडक्यात
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भीमाशंकरमधील टोरेंटच्या झाडातोडीवर टीका केली. 150-200 वर्षे जुनी झाडे तोडण्याचे कायदेशीर कारण काय, असा सवाल त्यांनी केला. परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडली जात आहेत, कोणतीही जनसुनावणी झाली नाही, असा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे झाडातोडीची पाहणी करतील आणि याबाबत जाहीर सभा घेणार आहेत.