
सातारा : २७ ला ६.३१ लाख मुलांसाठी जंतनाशक मोहीम
बातमी थोडक्यात
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत मंगळवारी सातारा जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील ६ लाख ३१ हजार ६५६ मुलांना औषध देण्यात येणार आहे. विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शाळेबाहेरच्या मुलांचा यात समावेश असून ३ नोव्हेंबर रोजी मोप-अप डे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.