
खोखो मध्ये शालेय मुलींच्या संघाला तिसरे स्थान
बातमी थोडक्यात
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा, सितानायक तांडा येथील मुलींच्या संघाने तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. खेळाडूंचे मजबूत बचाव व सांघिक कौशल्य पाहून शालेय समिती सदस्यांनी व कर्मचार्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. शाळेने खेळातील यश मिळविण्याची परंपरा कायम ठेवली आहे.