
कोल्हापूरला दोन दिवस पाणी कपात
बातमी थोडक्यात
कळमवाडी योजनेच्या ३३ केव्ही हाय प्रेशर पाइपलाइनवर आयसोलेटर बसवल्यामुळे आजपासून कोल्हापूर शहराला दोन दिवस पाणी कपात भोगावी लागणार आहे. ए, बी आणि ई प्रभागातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बाधित होणार असून काही भागात बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या शिंगणापूर, बाळिंगा आणि नागदेववाडी या पंपिंग स्टेशन्समधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा विचार आहे.