
पुर्णेकराच्या हत्या प्रकरणात तल्ली-पापलू न्यायालयीन कोठडीत
बातमी थोडक्यात
ठाणे सत्र न्यायालयात एसआयटी पथकाने संतोष कनोजिया उर्फ तल्ली आणि अमित सिंग उर्फ पापलू यांना हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकारी वकिलांनी केलेली पोलीस कोठडीची मागणी न्यायमूर्ती गायत्री गुंठे यांनी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींनी तीन चॉपर वापरले, त्यापैकी दोन पोलिसांनी आणि एक एसआयटी पोलिसांनी दहिसर मोरी येथून जप्त केला. तल्ली आणि पापलू यांना तळोजा कारागृहात पाठवण्यात आले.