
मुल्हेरमध्ये रास क्रीडा महोत्सव सुरू
बातमी थोडक्यात
मुल्हेरमध्ये ३७८ वर्षांहून अधिक जुनी परंपरा असलेला रास क्रीडा महोत्सव शनिवारी सुरू झाला. केळीची पाने आणि फुलांनी सजवलेला २८ फूट व्यासाचा रथ हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. सोमवारी सायंकाळी ६.०३ वाजता १४ फूट उंचीच्या रास स्तंभावर या रथाचे ध्वजारोहण होणार आहे.